उद्योगाचे नियोजन पूर्वतयारी
उद्योग संस्कार झाले की वेळ येते उद्योग साक्षरतेची, म्हणजे उद्योग शिकण्याची... उद्योग हा कृतीमधून शिकण्याचा विषय आहे, ज्यात प्रत्येक विषय वेगळा आणि त्याची तयारी, नियोजन, योजना, नफा-तोटा, ध्येय आणि त्याची धारणा संपूर्ण वेगळी असते. त्यामुळे उद्योग नियोजनापूर्वी तयारी करणे आवश्यक आहे. उद्योगाची पूर्वतयारी, तुमचे उद्योग बिझनेस मॉडेल बनविण्यासाठी लागणाºया आवश्यक कागदपत्रांच्या कमी येते. त्यामुळे जर तुम्हाला उद्योग बिझनेसचे मॉडेल किंबहुना, आराखडा काढण्याचा वर्गपाठ पक्का करायचा असेल, तर हा पूर्वतयारीचा गृहपाठ पक्का करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील गोष्टींची वास्तव माहिती असणे आवश्यक आहे. १. सुरू करणारा किंवा केलेला उद्योग हा निव्वळ हौस आहे की, त्यात तुमचे काही ध्येय आणि लक्ष्य निश्चित केले आहे? २. तुमची मालमत्ता आणि जबाबदाºया किती आहेत? ३. तुम्हाला स्वत:चे प्रतीदिन किती उत्पन्न हवे आहे? ४. तुम्हाला त्या उद्योगाची तांत्रिक, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापनाची किती माहिती आहे? ५. तुम्ही निवडलेला उद्योग चिरकाळ टिकणारा आहे का? वरील जर माहिती तुम्ही योग्य आणि अचूक मिळविली, तर उद्योग बिझनेस ...